अमेरिकेच्या अनिश्चित भूमिकेमुळे आशियाई देश जवळ येताहेत; भारताच्या सक्रिय कूटनीतीची जगभर चर्चा
अमेरिकेच्या बदलत्या परराष्ट्र धोरणामुळे आशियातील अनेक मध्यम शक्तींना आपल्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक हितांसाठी पर्यायी भागीदारी मजबूत करण्याची गरज भासत आहे. भारताने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसोबत वाढवलेले संबंध या बदलत्या भू-राजकीय समीकरणाचे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.
ट्रम्प-सौदी अणुकराराने वाढली अण्वस्त्र प्रसाराची चिंता; मध्यपूर्वेत नवे धोकादायक समीकरण?
अमेरिका आणि सौदी अरेबियामधील नागरी अणुऊर्जा करारामुळे मध्यपूर्वेतील सामरिक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. सौदीला अणुऊर्जा विकसित करण्याची संधी मिळत असताना युरेनियम समृद्धीकरणाच्या शक्यतेमुळे इराणसह संपूर्ण प्रदेशात अण्वस्त्र स्पर्धा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.